शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष

By नारायण बडगुजर | Updated: August 12, 2024 16:54 IST

आम्हा दोघींना हप्‍त्‍याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही

पिंपरी : ‘‘याठिकाणी मासे विक्री करायची असेल तर आम्हाला दरमहा हप्‍ता द्यावा लागेल. नाही तर धंदा करू देणार नाही’’, असे म्हणत महिलेला धमकी दिली.  महिलेने हप्‍ता देण्‍यास नकार दिल्‍याने तिच्‍यावर कोयत्‍याने हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला. दोन महिलांच्‍या त्रासाला कंटाळून मासे विक्रेत्‍या महिलेने विषारी औषध पिऊन आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केला. भोसरी येथील बीआरटी बस थांब्यासमोर पालिकेच्या जागेमधील मच्‍छी मार्केटमध्‍ये ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे राहणा २९ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ११) भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी घरकुल, चिखली आणि भोसरी येथे राहणार्‍या दोन महिलांच्‍या विरोधात खुनाच्‍या प्रयत्‍नाचा गुन्‍हा दाखल केला. बीएनएस कायदा कलम १०९ (१), ३०८, ११५ (१), ३५१, ३५२, ३ (५), शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) मुंबई पोलिस अधिनियम कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा मासे विक्रीचा व्‍यवसाय आहे. दोन महिला फिर्यादी यांच्‍या दुकानावर आल्‍या. या ठिकाणी मासे विक्री करायची असेल तर यापूर्वी माझा भाऊ कुक्‍या याला हप्‍ते देत होते. तो आता तुरूंगात असल्‍याने आम्हा दोघींना हप्‍त्‍याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही, असे म्‍हणत फिर्यादी यांच्‍यासह इतर महिलांकडून दरमहा पैशाची मागणी केली. त्‍या दोन्‍ही महिला गेल्‍या १५-२० दिवसांपासून फिर्यादी महिलेला त्रास देत होत्‍या. दोन्‍ही महिला फिर्यादी यांच्‍या दुकानावर आल्‍या. गेल्‍या दोन महिन्‍यांपासून तू हप्‍त्‍याचे पैसे दिले नाहीस. तुला जास्‍त माज आला आहे काय? असे म्‍हणत त्‍या दोघांनी शिवीगाळ केली. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्‍हणत त्यांनी कोयता फिर्यादीच्या मानेवर मारला. मात्र फिर्यादी महिलेने तो वार चुकविला. महिलांच्या तीन महिन्‍यांपासूनच्‍या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने गुरुवारी (दि. ८) दुपारी चार वाजताच्‍या सुमारास विषारी औषध पिऊन आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. सध्‍या फिर्यादी महिला वायसीएम रुग्‍णालयात दाखल आहे. 

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसSocialसामाजिक