शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 11:19 IST

गेल्या काही दिवसांत मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस

ठळक मुद्देधरण पाणीसाठी वाढला तर विसर्ग वाढविण्यात येण्याची शक्यता

पवनानगर : धरणपाणीलोट क्षेत्रात असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरा वासियांवरचे पाणी कपातीचे घोंघावणारे संकट आता दूर झाले आहे.

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी शहराला एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात पवना नदीत विसर्ग देखील करण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 धरण परिसरात दिवसभरात ८२ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जुनपासुन १५४३मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळी १० वाजल्यापासुन पवना धरणाचे अर्धा फुटाने सहा दरवाजे उघडून २२०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे व धरण प्रशासनाच्या वतीने पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येईल असे पाटबंधारे विभागाचे उपभियंता अशोक शेटे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Pavna Nagarपवना नगरDamधरणWaterपाणीRainपाऊस