शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीवरील अधिकाऱ्यांना द्यावे लागणार ‘लोकेशन’; पोलिस नियंत्रण कक्ष दर दोन तासांनी घेणार ‘अपडेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:54 IST

गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी दवाखाना, मंदिर, बसस्थानक येथे हजेरी वही ठेवलेली असायची.

पिंपरी : बीट मार्शल दिलेल्या मार्गावर गस्त घालतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. मात्र, रात्र गस्तीवरील अधिकाऱ्यांना अशा प्रकारे क्यूआर कोडबाबत सक्ती नाही. त्यामुळे काही अधिकारी याचा गैरफायदा घेतात. आता रात्रगस्तीवर अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दर दोन तासांनी पोलिस नियंत्रण कक्षाकडून त्यांचे लोकेशन घेण्यात येणार आहे.

‘जागते रहो’ असे म्हणत पूर्वी पोलिसांना रस्त्यावर काठी आपटत गस्त घालायला लागायची. गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी दवाखाना, मंदिर, बसस्थानक येथे हजेरी वही ठेवलेली असायची. गस्तीवरच्या पोलिसाने गस्तीच्या वेळीच सही करायची पद्धत होती. यात अनेक त्रुटी असल्याने काही पोलिस यातूनच पळवाट काढायचे. आता या पळवाटेला संधी मिळणार नाही, अशी नवी क्यूआर कोड पद्धत पोलिसांकडून अवलंबली जात आहे. विशेषतः पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे पोलिसांना ठरलेल्या मार्गावर रात्री गस्त घालावीच लागणार आहे. कारण त्याच्या नोंदी क्षणात नियंत्रण कक्षाला कळत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पोलिस उपायुक्तांचे तीन परिमंडळ आहेत. प्रत्येक परिमंडळाकरिता एक पोलिस निरीक्षक असतो. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या रात्रपाळीचे उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक नेमणुकीस असतात. त्यांना गस्तीची हद्द ठरवून दिलेली असते. मात्र, काही अधिकारी रात्री एकाच ठिकाणी थांबायचे. आम्ही अमूक ठिकाणी आहे, तमूक ठिकाणी आहे, असे वायरलेसवरून कळवायचे. आता मात्र पोलिसांच्या बीट मार्शलला (दुचाकीवरील पोलिस) क्यूआर कोडमुळे चुकारपणा करता येणे अशक्य आहे.

रात्री चारवेळा द्यावी लागणार माहितीरात्रगस्तीवरील काही पोलिस अधिकारी चुकारपणा करतात. एखादा मोठा गुन्हा घडला तरच ते त्या ठिकाणी हजर होतात. यावर पोलिस आयुक्तांनी उपाय शोधला आहे. रात्रगस्तीवरील अधिकाऱ्यांना रात्री अकरा, एक, तीन आणि पहाटे पावणेपाच वाजता आपले लोकेशन पोलिस नियंत्रण कक्षाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे रात्री अधिकाऱ्यांना गस्त घालावी लागणार आहे.

...तर करावा लागणार खुलासारात्री कॉलला उत्तर न देणाऱ्या, तसेच लोकेशन न पाठविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास त्याचा कसुरी अहवालही पोलिस आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक