शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Parth pawar : आम्ही भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार, पार्थ पवारांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 19:16 IST

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिण म्हणजे पार्थ यांच्या आत्यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  

मुंबई - आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आप्तेंष्टांवर धाडी टाकल्यानंतर पवार कुटुंबीयांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. आता, अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला.  

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. पार्थ पवार सध्या पिंपरी चिंचवड येथील कामांवरुन भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिण म्हणजे पार्थ यांच्या आत्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  

काय म्हणाले होते शरद पवार 

उत्तर प्रदेशच्या घटनेला जालियनवाला बाग म्हटल्याने आमच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. या केंद्राच्या दबावाला जरा सुध्दा भीक घालणार नाही, त्यांना काय करायचे आहे ते करू द्या असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. तसेच, या छाप्यांवरून शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली होती. अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असाही टोला पवारांनी लगावला होता. 

टॅग्स :parth pawarपार्थ पवारBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCorruptionभ्रष्टाचार