शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी पालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे होणार स्वागत : चौफेर टीकेनंतर घूमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:26 IST

महापालिकेच्या स्थापनेपासून संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची परंपरा सुरु आहे.

ठळक मुद्देसंत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज पालखीसोहळा स्वागत परंपरा सुरू राहणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते़. ही परंपरा महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे. दिंडीप्रमुखांना भेट देण्याची परंपरा संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून ही परंपरा खंडित केली जात आहे, असे वृत्त प्रकाशित होताच महापौर राहुल जाधव यांनी दखल घेतली आहे. वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पालखी सोहळ्यांचे स्वागत करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या पिंपरी-चिंचवड शहरातून जातात. महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात येतो. या वेळी महापालिकेतर्फे सेवा म्हणून एक भेटवस्तू देण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरही ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण गाजले होते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. निविदा पक्रियेतील त्रुटी यामुळे वारीतील भेटवस्तू प्रकरण गाजले होते. चौकशी समितीच्या शिफारशी बासनात मूर्ती आणि ताडपत्री गैरव्यवहार प्रकरण चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने प्रशासनास काही शिफारशी केल्या होत्या. त्यात वर्षभरातील सण उत्सवांचे नियोजन करावे. वेळापत्रक बनवावे व उत्सवापूर्वी काही महिने अगोदरच निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, या शिफारशी प्रशासनाने बासनात बांधल्या होत्या. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ‘‘संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असल्याची टीका विरोधीपक्षाने केली होती. त्यामुळे वारकऱ्यांचे स्वागत आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यावर्षी खंडित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असला तरी विरोधीपक्षातर्फे स्वागत केले जाणार आहे. परंपरा खंडित केली जाणार नाही.’’ अशी टीका केली होती. प्रशासनाच्या अनियोजनामुळे परंपरेस खोडा बसणार होता. विरोधीपक्षाकडून टीका होऊ लागल्याने महापौर राहुल जाधव यांनी परंपरेप्रमाण पालख्यांचे स्वागत केले जाणार आहे. ...........वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शहरातून जातात. त्यामुळे सोहळ्याचे स्वागत करण्याची परंपरा खंडित होणार नाही. तसेच महापालिकेच्या वतीने सोहळ्यास विविध मूलभूत सुविधा पुरविण्याचे कामही केले जाणार आहे. याबाबत प्रशासनास सूचनाही केल्या आहेत.- राहुल जाधव, महापौर

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस