शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी नोट..! सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार असल्याने खळबळ

By नारायण बडगुजर | Updated: February 9, 2025 18:54 IST

सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांकडे चौकशी करण्यात येत

- नारायण बडगुजर 

पिंपरी : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस -३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी (दि. ८) सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार समोर आला. ही सोसायटी नॅशनल डिफेन्स ॲकडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी याबाबत बावधन पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. यादव हे त्यांच्या सोसायटीतील इतर दोघांसोबत शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान लिफ्टमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना लिफ्टजवळ एक चलनी नोट दिसून आली. त्या नोटवर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे नमूद असल्याचे दिसून आले. त्यामुळे यादव यांनी पोलिसांकडे धाव घेत अर्ज दिला. तसेच पाकिस्तानी चलनी नोट देखील पोलिसांच्या ताब्यात दिली.

 

बावधन पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच सोसायटीत कोण आले? डिलिव्हरी बाॅय आले का? याबाबतही पोलिस माहिती घेत आहेत.

सोसायटीतील लिफ्टजवळ आढळलेली पाकिस्तानी चलनातील नोट पोलिसांकडे दिली आहे. तसेच याबाबत अर्जही दिला आहे. - सहदेव यादव, अध्यक्ष, आयरिस ३ सोसायटी, भुकूमसोसायटीत पाहणी केली. मात्र, सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असले तरी रेकाॅर्डिंग बंद आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. याप्रकरणी गांभिर्याने चौकशी करण्यात येत आहे. -विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, पिंपरी-चिंचवड 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPakistanपाकिस्तानPuneपुणे