शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून हे मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावे याकरीता शहरातील पोलीसदल सक्षम आणि सतर्क आहे, हा संदेश देण्यासाठी वाकड पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. ...
इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याने फोन करून विचारणा केल्यावरून मुख्याध्यापकांना केबिनमध्ये घुसून फ्लॉवरपॉट फेकून मारला. ही घटना तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमध्ये घडली. ...
तरुणाला लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कासारवाडीतील मैला शुद्धीकरण केंद्राच्या आवारात घडली. ...
दुचाकीला ठोकर मारल्याचा बहाणा करुन एका वाहनचालकाकडून साडेतीन हजार रुपये उकळून फसवणूक केली. हा प्रकार भोसरीतील ई प्रभाग कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. ...