पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:38 IST2021-06-09T20:27:48+5:302021-06-09T20:38:39+5:30
नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना राज्यानं भोगलेली असताना अशाच प्रकारची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही
नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना राज्यानं भोगलेली असताना अशाच प्रकारची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पिपंरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाली. पण कर्मचाऱ्यांच्या सजगतेनं आणि अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलानं तातडीनं गळतीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
VIDEO: पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती!, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली; जीवितहानी नाही pic.twitter.com/XoS6lWJyGi
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2021
नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये १५० रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन टाकीमधून गळती झाल्याने अर्धा तास इथला ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे २२ रुग्णांना प्राण गमावावे लागले होते.