शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

इंद्रायणी स्वच्छतेसाठी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 2:09 AM

इंद्रायणी नदीवरील चिखली येथील सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)च्या अधिकृततेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती.

पिंपरी : इंद्रायणी नदीवरील चिखली येथील सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)च्या अधिकृततेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. चिखलीतील एसटीपी प्रकल्प अधिकृतच असल्याचे पुरावे महापालिकेने दिले असून, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प केला जाणार आहे, अशी भूमिका महापौर राहुल जाधव यांनी घेतली आहे.महापालिका क्षेत्रात पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या आहेत. महापालिकेच्या वतीने सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प राबविले जातात. मात्र, ही यंत्रणा सक्षम नसल्याने तीस टक्के पाणी नदीत प्रक्रियेविनाच सोडले जाते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने एसटीपी आरक्षणे विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार चिखलीतील आरक्षण विकसित केले आहे. महापालिकेत १९९७ मध्ये काही गावांचा समावेश झाला. त्यानंतर २००८ मध्ये या गावांचा नव्याने आराखडा तयार केला. त्यानुसार २०१५ ला आरक्षण ताब्यात घेतले आहे. त्यानंतर यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार काम सुरू झाले आहे. चिखलीतील या एसटीपीला राष्टÑवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी एसटीपीचे काम अनधिकृत आहे़ हे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘एसटीपी उभारायचे नाही, तर शहराची गटारगंगा करायची का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज महापौर राहुल जाधव यांनी या प्रकल्पाचे पुरावे देऊन एसटीपी हा अधिकृत आहे, हे सांगितले व नदी स्वच्छतेसाठी एसटीपी आवश्यक आहे.बिल्डरने केली फसवणूकमहापौर म्हणाले, ‘‘नद्याचे प्रदूषण ही वाढती समस्या आहे़ त्यामुळे नदी सुधार प्रकल्प राबविण्याबरोबरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. तेथील नागरिकांची फसवणूक महापालिकेने केली नाही तर बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांना जाब विचारावा.’’ तसेच नदी स्वच्छ ठेवणे हे प्रमुख आव्हान असून, महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या परिसरातएसटीपी प्रकल्प व्हायलाच हवा, अशी भूमिका शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांनी घेतली आहे.>एसटीपी प्रकल्पचिखलीतील आरक्षण - २००८आरक्षण ताब्यात आले- २०१५एसटीपीचे क्षेत्र- १२ एकरएसटीपीक्षमता- १२एमएलडी निविदा रक्कम- ९.९० कोटीकामाची मुदत- मार्च २०२०>नद्या प्रदूषित होताहेत म्हणून बोंब मारायची. कोणत्याही गोष्टींना विरोध करणे विरोधीपक्षाचे कामच आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ राहावी, म्हणून एसटीपी आवश्यकच आहे. ज्या ठिकाणी आरक्षण होते. त्याच ठिकाणी होत आहे. महापालिका कोणतेही अनधिकृत बांधकाम करीत नाही. त्यामुळे इंद्रायणीचे हीत म्हणून एसटीपी व्हावी. कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही करणारच आहे.- राहुल जाधव, महापौर>महापालिका क्षेत्रातील नद्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नद्यांमध्ये सोडण्याचे प्रमुख आव्हान महापालिकेसमोर आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपीची सर्व आरक्षणे विकसित करायला हवीत. आरक्षण विकसित करताना शेतकऱ्यांचे मतही विचारात घ्यावे. शंभर टक्के सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावे.- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना>शहरातून तीन प्रमुख नद्या वाहतात. मात्र, नागरीकरण वाढल्याने तसेच औद्योगिक परिसर वाढल्याने रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये प्रक्रियाविनाच सोडले जाते. सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी प्रक्रिया करूनच सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटीपींची असणारी आरक्षणे विकसित करायला हवीत. तसेच रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडणाºया कंपन्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. त्यातून नद्याचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.- सचिन चिखले, गटनेते मनसे