शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

सीमा सावळेंसह ८ जण बाहेर, भाजपाने घेतले १० सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:23 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजपाने समितीतील सर्व सदस्यांचे राजीनामे घेतले आहेत.महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक व अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ‘ड्रॉ’ काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु, सभा दुपारी २ वाजता होणार होती. स्थायीतील भाजपा नगरसेवकांमध्ये चर्चेची खलबते सुरू होती. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळेच सभेला उशीर झाल्याची चर्चा होती.पहिल्याच चिठ्ठीत अध्यक्षांची विकेटसमितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठी सोडतीद्वारे बाहेर पडावे लागले आहे. लकी ड्रॉ मध्ये सभापतीचे काय होणार? अशी चर्चा महापालिका वर्तुळात होती. पहिल्याच चिठ्ठीने स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांची पहिलीच ‘विकेट’ घेतली. सभेच्या सुरुवातीलाच ‘पारदर्शकपणे’ पत्रकारांच्या हस्ते ही सोडत काढली. त्यात सावळेंसह, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी या भाजपाच्या सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांच्या नावाच्या चिठ्ठया निघाल्या. त्यामुळे हे सदस्य केवळ २८ फेब्रुवारीपर्यंतच राहणार आहेत. तर लकी ड्रॉमध्ये भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे तर राष्टÑवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आणि शिवसेनेचे अमित गावडे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ठरले आहेत. सलग दुसºया वर्षी स्थायी समितीत काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.>स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी महापालिकेतील सर्व सदस्यांची मागणी होती. त्यानुसार स्थानिकपातळीवर एकमत झाले आणि सध्याच्या समितीतील सदस्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. स्थानिक पातळीवरील प्रस्तावावर पक्षश्रेष्ठींचे मत घेतले जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट घेणार आहेत.- लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड