शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना प्रतिकार केल्याने दहा लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:07 IST

टाटा मोटर्स कंपनीच्या चारचाकी पार्किंगसमोरुन रस्ता ओलांडत असताना भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले... 

पिंपरी : मनी एक्स्चेंज करण्यासाठी दहा लाखांची रोकड घेवून जाणाऱ्या तरुणावर चोरट्याने कोयत्याने वार करुन रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोयत्याने वार करुनही तरुणाने चोरट्यांचा प्रतिकार केल्याने रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना बुधवारी भरदिवसा दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील टाटा मोटर्स कंपनीजवळ घडला. मोहन आढागळे असे चोरट्यांचा प्रतिकार केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप रामभाऊ गायकवाड (वय ४८, रा. सदगुरु क्लासिक, न्यु, अहिरेगाव, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (१७ मार्च) दुपारी साडेतीनच्या सुमारास गायकवाड व त्यांचे मित्र मोहन आढागळे हे त्यांच्या कार्यालयातर्फे मनी एक्स्चेंज करण्यासाठी भारतीय चलनाच्या १० लाख रुपयांच्या नोटा घेवून जात होते. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनीच्या चारचाकी पार्किंगसमोरुन रस्ता ओलांडत असताना भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले. मोहन यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मोहन यांनी प्रतिकार केला असता तिघा आरोपींपैकी एकाने मोहन यांच्या हातावर कोयत्याने वार केला. त्यामध्ये ते जखमी झाले. दरम्यान, चोरट्याने मोहन यांच्याकडील मोबाईल लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी