पिंपरी : चारचाकी वाहन भाडेतत्वावर पाहिजे होते. त्यासाठी ऑनलाइन सर्च करून एका उपलब्ध झालेल्या मोबाइल क्रमांवर संपर्क साधून एका लिंकवरून ट्रान्झेक्शन केले. त्यानंतर बँकेच्या खात्यातून 43 हजार रुपये कपात झाले. 28 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 ते सव्वाअकराच्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संदीप परशुराम गायकवाड (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी गायकवाड यांना चारचाकी वाहन भाडेतत्त्वार पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइल सर्चिंग केले असता एका वेबसाईटवर त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर एका अन्य मोबाइल क्रमांकावरून एक लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी ट्रान्झेक्शन केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 43 हजार रुपये कपात झाले. ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सांगवी पोलीस तपास करत आहेत.
भाडेतत्त्वारील वाहनाचे ऑनलाइन सर्चिंग पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 14:26 IST
बँक खात्यातून कपात झाले 43 हजार रुपये
भाडेतत्त्वारील वाहनाचे ऑनलाइन सर्चिंग पडले महागात
ठळक मुद्देबँकेच्या खात्यातून 43 हजार रुपये कपात सकाळी 10 ते सव्वाअकराच्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार