ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना
By नारायण बडगुजर | Updated: June 11, 2024 18:32 IST2024-06-11T18:31:39+5:302024-06-11T18:32:17+5:30
तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणार्या ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली....

ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना
पिंपरी : ऑनलाईन जॉब केल्यास आर्थिक फायद्याचे आमिष दाखवले. त्यातून विश्वास संपादन करून तरुणाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे येथे ३० नोव्हेंबर २०२२ ते ४ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणार्या ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जॉसलीन नावाच्या संशयित व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने फिर्यादीशी व्हॉटसअॅप व फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला. जाहिरातीद्वारा ऑनलाईन जॉबबाबत माहिती दिली. ऑनलाईन जॉब केल्यास अधिकच्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची दोन लाख दोन हजार ४५१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक भरत वारे तपास करीत आहेत.