शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

कांदा आवकेत वाढ; बटाटा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:43 PM

चाकण बाजार समिती : हिरव्या मिरचीचे भाव स्थिर, तर टोमॅटो, वांगी यांची भाववाढ

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले. बटाट्याची आवक घटली. कांदा, बटाटा, भुईमूग शेंगा, लसूण व हिरव्या मिरचीचे भाव स्थिर राहिले. कांद्याला ३०० ते १००० व बटाट्याला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तरकारी विभागात हिरवी मिरची व टोमॅटोची आवक वाढली. टोमॅटो, वांगी, दोडका, फरशी, वालवड, शेवगा, कोबी-फ्लॉवरचे भाव वाढले, तर वाटाणा, गवारचे भाव घटले. मेथी व कोथिंबिरीचे भाव दुपटीने वाढले. जनावरांच्या बाजारात गाईंची विक्री चारपटीने घटली, तर म्हशी व शेळ्या-मेंढ्यांची विक्री वाढली. चाकण बाजारात एकूण उलाढाल २ कोटी ६० लाख रुपये झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४३०० क्विंटल झाली. कांद्याची आवक १८८० क्विंटलने वाढून कमाल भाव १००० रुपयांवर स्थिर राहिला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १४९३ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६०७ क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव १३०० रुपयांवर स्थिर राहिला. भुईमूग शेंगाची आवक ५ क्विंटल होऊन भाव ५००० रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक १० क्विंटल होऊन लसणाचा कमाल भाव २ हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४९६ पोती झाली. मिरचीला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात मेथीची १ लाख ४० हजार जुड्यांची आवक होऊन ३०१ ते १५५१ रुपये प्रती शेकडा जुड्यांंना भाव मिळाला. कोथिंबीर ७० हजार जुड्यांची आवक होऊन २५१ ते २४०१ रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक १५ हजार जुड्या झाली. ४०१ ते ८०१ असा जुड्यांना भाव मिळाला.शेतीमालाची आवक व बाजारभाव : कांदा - एकूण आवक - ४३०० क्विंटल. भाव क्रमांक १ : १००० रुपये, भाव क्रमांक : ८०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३०० रुपये.बटाटा - एकूण आवक - १४९३ क्विंटल. भाव क्रमांक १ : १३०० रुपये, भाव क्रमांक २ : १००० रुपये, भाव क्रमांक ३ : ६०० रुपये.भुईमूग शेंग - एकूण आवक - ५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५००० रुपये, भाव क्रमांक २ : ४५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये.लसूण - एकूण आवक - १० क्विंटल. भाव क्रमांक १ : २००० रुपये, भाव क्रमांक : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.फळभाज्या : आवक डागांमध्ये व भाव प्रती १०० किलो : हिरवी मिरची - ४९६ पोती ( १५०० ते २५०० रु. ), टोमॅटो - १०२५ पेट्या ( ५०० ते १२०० रु. ), कोबी - ३९८ पोती ( ३०० ते ६०० रु. ), फ्लॉवर - ४१९ पोती ( ५०० ते १२०० रु.), वांगी - ३२७ पोती ( २००० ते ३००० रु.), भेंडी - ४६५ पोती ( २५०० ते ३५०० रु.), दोडका - २६८ डाग ( २५०० ते ३५०० रु.), कारली - ३७४ डाग ( २००० ते ३००० रु.), दुधीभोपळा - १८० पोती ( ५०० ते १२०० रु.), काकडी - ३१३ पोती ( १५०० ते २५०० रु.), फरशी - १६८ पोती ( २५०० ते ४४०० रु.), वालवड - ३७५ पोती ( २००० ते ४००० रु.), गवार - २१७ पोती ( ३००० ते ४००० रु.), ढोबळी मिरची - ४८६ डाग ( १२०० ते २२०० रु.), चवळी - १५४ डाग ( १५०० ते २५०० रु. ), वाटाणा - ६१८ पोती ( २००० ते ३००० रु. ), शेवगा - ९३ डाग ( ३००० ते ५००० रुपये ).४पालेभाज्या : एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्या : मेथी - एकूण १९९७३ जुड्या ( ५०० ते १२०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २२५६८ जुड्या ( ५०० ते १४०० रुपये ),शेपू - एकुण ४५४६ जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ५१९५ जुड्या ( ४०० ते ६०० रुपये).४जनावरे : विक्रीसाठी आलेल्या ४५ जर्शी गाईंपैकी २३ गार्इंची विक्री झाली. ( १०,००० ते ६०,००० रुपये ),१९० बैलांपैकी ११० बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३५,००० रुपये ), २२० म्हशींपैकी १६० म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते १,००,००० रुपये ),शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८४४० शेळ्या - मेंढ्यांपैकी ७१४० शेळ्या - मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (१५०० ते १०,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात १ कोटी ९० लाख रुपये उलाढाल झाली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड