सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 22:51 IST2023-01-04T22:49:34+5:302023-01-04T22:51:00+5:30

डोक्यात सिमेंटचा गट्टू टाकून एकाचा खून केला. रावेत येथे मंगळवारी (दि. ३) रात्री नऊ ते बुधवारी (दि. ४) सकाळी पावणेदहा या कालावधीत ही घटना घडली.

One was killed by putting a cement block on his head | सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून एकाचा खून

सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून एकाचा खून

पिंपरी :

डोक्यात सिमेंटचा गट्टू टाकून एकाचा खून केला. रावेत येथे मंगळवारी (दि. ३) रात्री नऊ ते बुधवारी (दि. ४) सकाळी पावणेदहा या कालावधीत ही घटना घडली. राजू उर्फ राजेश (वय ३५) असे मयताचे नाव आहे. विकास प्रकाश जाधव (वय ३६, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रावेत गावठाण येथे पत्राशेड आहे. ते त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. या पत्राशेडमध्ये राजेश याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा ब्लाॅक घालून जखमी केले. यात राजेश याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Web Title: One was killed by putting a cement block on his head