पिंपरी-चिंचवड: पोलीस असल्याचे सांगून घरातूनच केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:42 AM2021-11-20T11:42:35+5:302021-11-20T11:44:34+5:30

पिंपरी : पोलीस असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने एकाचे घरातून अपहरण केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात बुधवारी रात्री ...

one was kidnapped from house hinjawadi crime | पिंपरी-चिंचवड: पोलीस असल्याचे सांगून घरातूनच केले अपहरण

पिंपरी-चिंचवड: पोलीस असल्याचे सांगून घरातूनच केले अपहरण

googlenewsNext

पिंपरी : पोलीस असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने एकाचे घरातून अपहरण केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने अनोळखी व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने आपण पोलीस असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यांच्या ४० वर्षीय पतीला त्याच्यासोबत पळवून नेले. फिर्यादींनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादींच्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली. फिर्यादी व पोलिसांनी याप्रकरणाची खात्री करून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: one was kidnapped from house hinjawadi crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.