शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:52 IST

चिंचवडच्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना, एक जण गंभीर जखमी

ठळक मुद्देआरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी: टपरीवरून सिगारेट आणण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मंगळवारी रात्री इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड येथे ही घटना घ़डली आहे. सतीश उर्फ रोहित देविदास शिंगाडे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पवार, गोपल्या दांडे, बाळ्या उर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शिंगाडे हे आक्रमक खान मित्राच्या वाढदिवस साजरा करून घरी जात होते.  त्यावेळी रस्त्याच्या कडेला आरोपी घोळका करून थांबले होते. त्यातील अमोल पवार त्यांना मारून शेजारच्या टपरी वरून सिगारेट आणण्यास सांगितले. तेव्हा नकार देत 'मी आता घरी चाललो आहे, तू दुसऱ्या कोणाला तरी सांग' असे पवार याला सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने त्याने शिंगाडे यांच्या गालावर चापट मारली. यावर त्यांनी जाब विचारला असता  आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ केली. नंतर कोयते, चाकू आणि दगडाने डोक्यात, पोटावर आणि अंगावर ठिकठिकाणी मारून खूनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू