शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण एकाला पट्ट्याने मारहाण करणे पडले महागात, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:20 IST

शिवीगाळ करत कंबरेच्या पट्ट्याने मारहाण करून केले जखमी

ठळक मुद्देपिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली असलेल्या कुरेशी शॉपच्या समोरील मोकळ्या जागेत हि घटना घडली

पिंपरी: उड्डाणपुलाखाली  मोकळ्या जागेत एक व्यक्ती बसली असताना 'तू इथे का बसला', असे म्हणत शिवीगाळ करत कंबरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ती व्यक्ती जखमी झाली असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली सोमवारी ही घटना घडली. 

दत्ता अनिल देशमुख (वय ३७, इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील मार्केटमधील मोकळ्या जागेत, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. फारुख कुरेशी (वय ४५, रा. नेहरू नगर, पिंपरी) व अनोळखी दोघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख हे पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली असलेल्या कुरेशी शॉपच्या समोरील मोकळ्या जागेत झोपेतून उठून बसले होते. फारूक कुरेशी तेथे येऊन देशमुख यांना 'येथे का बसला', अशी विचारणा केली. ते उत्तर देण्याअगोदरच कुरेशीने शिवीगाळ करून त्यांच्या तोंडावर लाथ मारली. त्यामुळे ते जमिनीवर पडले. त्यावेळी त्याच्या सोबतच्या दोघांनी कंबरेच्या पट्ट्याने देशमुख याना मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक