शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

एकीकडे पाेलीसांचा टवाळखाेरांवर वचक तर दुसरीकडे अाराेपींची पाेलिस ठाण्यात अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 13:27 IST

एकीकडे पाेलीस महाविद्यालयांच्या परिसरात भटकणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करत असताना, दुसरीकडे पाेलीसांशी हुज्जत घालण्याच्या घटनाही समाेर अाल्या अाहेत.

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात व्हावे. ही मागणी एकदाची पूर्णत्वास आली. १५ आॅगस्टपासून पोलीस आयक्तालयाचे कामकाजही सुरू झाले. पोलीस यंत्रणा पुर्वीपेक्षा अधिक गतीने  कार्यन्वीत झाल्याचे जाणवू लागले. रोज सकाळी पोलीस फौजफाटा  महाविद्यालयांच्या आवारात टवाळखोरांवर कारवाई करण्यास जात आहे. ही कारवाई सलग तीन दिवसांपासून सुरू आहे. हे घडत असताना, थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी आरेरावी करण्याच्या घटनाही गेल्या तीन दिवसात सलग घडल्या आहेत. पोलीस महाविद्यालय आवारात आणि आरोपी पोलीस ठाण्यात असे चित्र नव्या पोलीस आयुक्तालयानंतर अधिक जाणवू लागले आहे.

    दोन दिवसांपुर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात मद्यधुंद नशेतील तरूणींनी पोलिसांशी आरेरावी केली. या घटनेनंतर हिंजवडीत वाहतुक पोलीसाला वाहनचालकाकडून धक्काबुकी झाली. या दोन घटना ताज्या असताना,सांगवी पोलीस ठाण्यात रात्री १० च्या सुमारास फिर्यादीला पोलीस कर्मचाऱ्यांसमोर तेसुद्धा थेट पोलीस ठाण्यात मारहाण केली. फिर्यादीने दुकानातून सिगारेट घेतले, तो  दुकानाजवळ थांबला असता, त्यास येथे सिगारेट पिऊ नको, असे सांगत आरोपीने शिवीगाळ केली,एवढेच नव्हे तर त्यास मारहाण केली. गस्तीवरील पोलिसांनी हा प्रकार पाहिला. फिर्यादी सांगवी पोलीस ठाण्यात येऊन घडल्या प्रकाराची फिर्याद देत असताना,तीन आरोपी तेथे आले. त्यांनी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्यासमक्षच फिर्यादीच्या थोबाडीत मारली. बहेर लावलेल्या फलेक्सचा लोखंडी पाईप घेऊन येऊन पोलीस ठाण्यात ते टेबलावर जारजोरात पाईप आपटू लागले. आरडा अाेरडा करून सरकारी कामात त्यांनी व्यत्यय आणला. या सलग घडलेल्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीतील  नियोजनात काहीतरी चुकीचे होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.     विद्यार्थ्यांमध्ये दहशत; गुंड मोकाट     पोलिसांनी टवाळखोरांविरूद्ध महाविद्यालय आवारात सुरू केलेली मोहिम स्तुत्य आहे. परंतू महाविद्यालय आवारात जे गणेवशात नाहीत. संशयितरित्या ज्यांचा वावर आहे. अशांना हटकले पाहिजे. रोजच महाविद्यालयात पोलीस दिसू लागल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दहशत बसू लागली आहे. महाविद्यालयाच्या तक्रार पेटीत मुलींनी काही छेडछाडीच्या तक्रारी दिल्या आहेत का? याची माहिती घेऊन पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. असे मत पालक व्यकत करू लागले आहेत. या उलट परिस्थिती पोलीस ठाण्यांमध्ये असल्याचे काही घटनांमधुन निदर्शनास आले आहे.  पोलीस चौकीत जाऊन पोलिसांनाच धमकावले जात असेल तर येथील गुंडगिरीवर कसा वचक आणणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थी