पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:30 PM2020-04-08T20:30:56+5:302020-04-08T20:47:49+5:30

४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

One patient grew up in Pimpri-Chinchwad, infection due to a person returning from the Markaj program; Number up to 22 | पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग

Next
ठळक मुद्देएनआयव्हीकडे शहरातील ५७ रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने पाठविले होते तपासणीसाठी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५७ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ४८जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी निगेटिव्ह आले होते. तर एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यानंतर उर्वरित आठ जणांचे प्रतीक्षेत अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22 झाली आहे. तर २६ जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे.
 पिंपरी-चिंचवडमध्ये संशयित रूग्णांचा आकडा वाढत आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे शहरातील ५७  रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैैकी ४८ जणांचे अहवाल अहवाल बुधवारी रात्री रात्री निगेटिव्ह आले होते. तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज २६ रूग्ण नव्याने दाखल झाले असून उर्वरित ३३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते.  त्यामुळे कोरोना रूग्णाची संख्या 22 आहे. तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ३४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.  कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, आजच्या अहवालात एक जण पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती ३६ वर्षांची आहे. तर मरकज येथून कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नवीन रूग्णास कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Web Title: One patient grew up in Pimpri-Chinchwad, infection due to a person returning from the Markaj program; Number up to 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.