कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्याने एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:13 IST2019-09-19T21:13:30+5:302019-09-19T21:13:37+5:30
भिंतीवरून खाली उतर असे सांगितल्याने एकास काठी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली.

कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्याने एकाला मारहाण
पिंपरी : भिंतीवरून खाली उतर असे सांगितल्याने एकास काठी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली.
कैलास सोपान ताम्हाणे (वय ४५, रा. हनुमान हौसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दत्ता आडवाणी (रा. कृष्णा हौसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी आडवाणी हा कंपाऊंडच्या सीमाभिंतीवर चढला होता. त्यास ताम्हाणे यांनी खाली उतरण्यास सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने कैलास यांना दगड मारला. यामध्ये कैलास जखमी झाले. त्यानंतर पुन्हा शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.