भरदिवसा दीड लाखांची घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:44 IST2019-02-26T20:43:52+5:302019-02-26T20:44:37+5:30
घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने व रोकडा असा दीड लाखांचा ऐवज लंपास केला.

भरदिवसा दीड लाखांची घरफोडी
पिंपरी : घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने व रोकडा असा दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मोशीतील गायकवाड वस्ती येथील रिव्हर ब्रीज हौसिंग सोसायटीत सोमवारी भरदिवसा दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुनेत्रा हनुमंत कुलकर्णी (वय ४५, रा. फ्लॅट क्रमांक ५०८, रिव्हर ब्रीज हौसिंग सोसायटी, मोशी ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुलकर्णी यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरटे घराचा कडीकोयंडा उचकटून आत शिरले. कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी, चांदीच्या मुर्त्या व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.