शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मारहाण प्रकरणातील जखमीचा मृत्यू, दोघे अटकेत, एक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 2:48 AM

विकासनगर-किवळे येथील टी सी कॉलनी येथे एका २३ वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून रविवारी (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास तिघांनी अडवून लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती.

किवळे  - विकासनगर-किवळे येथील टी सी कॉलनी येथे एका २३ वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून रविवारी (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास तिघांनी अडवून लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना शनिवारपर्यंत (दि. ६) पोलीस कोठडी सुनावली.वीरन ऊर्फ गुड्डू मलंग मुत्तू (वय २२, रा. टी. सी. कॉलनी, विकासनगर, किवळे ) व संदीप ऊर्फ संद्या शंकर विटकर (वय ३०, रा. आदर्शनगर, शिंदे नर्सरीजवळ, किवळे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या फरारी साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. मोनू विजय टाक (वय २३, रा. फ्लॅट नं. ए २/७, सौदागर गार्डन, विकासनगर, किवळे) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय टाक यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकासनगर येथील सौदागर गार्डनच्या मागील बाजूच्या टी सी कॉलनी येथून मोनू टाक रविवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी त्याला अडविले. वीरन याने ‘तुला खूप माज आला आहे. तुला आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणून मोनूच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला.संद्या व त्यासोबत असणाºया साथीदाराने मोठ्या दगडाने छातीत व पोटावर मारून त्यास गंभीर जखमी केले. जखमी मोनूवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार व त्यांच्या कर्मचाºयांनी सोमवारी रात्री सापळा रचून वीरन व संदीप या दोघांना अटक केली.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे