लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 01:08 PM2019-08-05T13:08:38+5:302019-08-05T14:00:50+5:30

मुसळधार पाऊस व हवेमुळे  भांगरवाडी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास घर पडल्याने एक जणाचा जागीच मृत्यु झाला. दोन दिवस लोणावळ्यात दोन जणाचा घरे पडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

One dies after falling from house in Bhangarwadi near Lonavla | लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु 

लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु 

googlenewsNext

लोणावळा : मुसळधार पाऊस व हवेमुळे  भांगरवाडी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास घर पडल्याने एक जणाचा जागीच मृत्यु झाला. दोन दिवस लोणावळ्यात दोन जणाचा घरे पडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोणावळा शहरात गत 24 तासात तब्बल 384 मिमी लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे धरण पहाटे साडेपाच वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या  सांडव्यावरुन साधारण 2  क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीपात्रात येऊ लागल्याने धरणालगत असलेल्या आयएनएस शिवाजीच्या नौसेना बाग ह्या रहिवासी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काल हनुमान टेकडी येथे एक दुमजली घर खालच्या घरावर पडल्याने एका अकरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात त्याचे वडील व बहीण जखमी झाले होते. 

जयप्रकाश नायडू (रा. भांगरवाडी, लोणावळा) असे या मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणावळ्यात मागील दहा बारा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मागील 24 तासात शहरात 207 मिमी तर 48 तासात 591 मिमी पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी हनुमान टेकडी येथे घर पडून एका बालकाचा मृत्यु झाला होता तर सोमवारी भांगरवाडीत घर पडून एकाचा मृत्यु झाला. घटनेची माहिती समजताच नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाने राडारोडा बाजुला करत मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Web Title: One dies after falling from house in Bhangarwadi near Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.