पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 21:55 IST2021-08-06T21:55:37+5:302021-08-06T21:55:46+5:30
रोशन गार्डनच्या पाठीमागे महादेवनगर येथे एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद
पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास महादेवनगर, भोसरी येथे करण्यात आली.
विशाल विकास माकुडे (रा. महादेवनगर, रोशन गार्डनच्या पाठीमागे, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक विजय तेलेवार यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन गार्डनच्या पाठीमागे महादेवनगर येथे एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी नंदनवन अपार्टमेंट येथे सापळा लावून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी विशाल माकुडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करत त्याच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.