शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी जुना की नवा चेहरा? इच्छुकांच्या मुंबईपर्यंतच्या नेत्यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:52 IST

या पदासाठी खासदार, आमदार, विविध आघाड्या, युवा अध्यक्ष, सरचिटणीस, प्रकोष्ठ, सहप्रकोष्ठ अशा २६ पदाधिकाऱ्यांनी मतदान केले

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदासाठी २६ प्रमुख नेत्यांनी गुप्त मतदान केले आहे. यानिमित्ताने जुना आणि नवा, खुला वर्ग आणि ओबीसी, असे नवे वाद उफाळून आले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदी जुना की नवा कार्यकर्ता, याविषयी चर्चा रंगली आहे. या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी इच्छुकांनी मुंबईपर्यंतच्या नेत्यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे.

आमदार शंकर जगताप यांचा भाजप शहराध्यक्ष पदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे महिन्याभरापासून नवीन शहराध्यक्ष कोण होणार, याचे चर्चितचर्वण सुरू आहे. मागील आठवड्यामध्ये मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांनी शहरात येऊन गुप्त मतदान घेतले. खासदार, आमदार, विविध आघाड्या, युवा अध्यक्ष, सरचिटणीस, प्रकोष्ठ, सहप्रकोष्ठ अशा २६ पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. आता प्रदेश समितीची २ मेरोजी बैठक होणार आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधून कोणाला संधी द्यायची, यावर चर्चा होणार आहे. येत्या रविवारी किंवा सोमवारी निवड जाहीर होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या नावांची आहे चर्चा

प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाजप युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, संजय मंगोडेकर, भाजपच्या महिला अध्यक्ष सुजाता पलांडे, शैलजा मोळक यांच्या नावाची चर्चा आहे. निष्ठावंत आणि नव्याने दाखल झालेल्या इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोर्चेबांधणी केली आहे. आमदार जगताप यांनाच पुन्हा संधी द्यावी, असे एका गटाचे म्हणणे आहे.

स्थानिक विरुद्ध बाहेरचे

सध्या शहरातील प्रमुख पदे स्थानिक नेत्यांच्या हातात आहेत. त्यामुळेा आता राज्याच्या विविध भागांतून शहरात आलेल्या निष्ठावंतांना संधी द्यावी, अशीही मागणी होत आहे. शहरात भाजपचे महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे असे चार आमदार असून, ते कोणाचे नाव सुचवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुती