थेरगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:40 IST2017-09-28T22:40:08+5:302017-09-28T22:40:20+5:30

थेरगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून
पिंपरी - पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथील पवार नगरमध्ये किरकोळ शिविगाळीतुन डोक्यात विट घालून रिक्षा चालकाने वृद्धाचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र अवघ्या अडिज तासात वाकड पोलिसांनी अरोपिला गजाआड़ केले आहे
सुभाष आबाराव वाघमारे (वय ६०, रा. पड़वळ नगर थेरगाव) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून आरोपी रिक्षा चालक सुभाष धर्मा पवार (वय ४८, रा पवार नगर थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मयत वाघमारे व पवार या दोघांमध्ये वाद झाला यातून वाघमारे याने पवारला शिविगालळ केली या वादाचे रूपांतर हानामारीत झाले रागाच्या भरात आरोपीने वाघमारेच्या डोक्यात विट घातली यात ते गंभीर जखमी झाले यानंतर आरोपिने पळ काढ़ला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस व नागरिकांनी वाघमारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र वाकड पोलिस ठान्याच्या तपास पथकाला अवघ्या अडीज तासात आरोपिला ताब्यात घेन्यायत यश आले. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.