शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या इमारतीच्या सीमाभिंतीला गेले तडे; पण प्रशासन दुर्घटनेनंतरच होणार का जागे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 13:40 IST

पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत.

ठळक मुद्देथेरगाव : नागुभाऊ बारणे शाळेची दुरवस्था, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीचा त्रास

शीतल मुंडे-  पिंपरी : थेरगाव येथे महापालिकेची मुला-मुलींची नागुभाऊ गतिराम बारणे ही शाळा आहे. शाळेची इमारत तीन मजली आहे. मात्र विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान नाही. त्याचप्रमाणे इमारत अतिशय जुनी झालेली आहे. शाळेच्या सीमाभिंतीला तडे गेलेले आहेत, घाणीचे साम्राज्य आहे.  पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. मात्र त्याच्याकडे शिक्षण विभाग व शाळा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाळेच्या अतिशय धोकादायक असलेल्या भिंतीजवळ लहान मुले खेळत असताना पाहणीमध्ये आढळले. नागुभाऊ गतिराम बारणे शाळा तीन मजली आहे. वर्ग खोल्या ह्या मोठ्या आहेत. मात्र मुलांच्या तुलनेत वर्ग खोल्यांमध्ये बॅचची संख्या कमी आहे. यामुळे काही मुलांनाजमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहेत. शाळेच्या तिसºया मजल्यावरील अनेक खोल्यांमध्ये तुटलेल्या बाखांचा खच बघायला मिळतो. शाळेच्या परिसरामध्ये जागोजागी कचºयाचे साम्राज्य दिसते. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.  .....शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण परिसरामध्ये भिंतींना शेवाळ आलेले आहे. ज्या टाकीमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आलेले आहे. त्या टाकीलादेखील शेवाळ आलेले आहे. अशा प्रकारचे दूषित पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागते. .............शाळेमधील बहुतांश विद्यार्थ्यांचे गणवेश जुने व फाटलेले आहेत. शाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना फाटलेल्या गणवेशामध्येच शाळेमध्ये यावे लागत आहे. ..................शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करण्यात येत नाही. शाळेच्या परिसरामध्ये कचरा दिसतो. वर्गखोल्यांच्या बाहेर कचरा पडलेला असतो. तुटलेले बँच, फळे, खुर्ची अशा प्रकारच्या अनेक निकामी वस्तू पडून आहेत. ..

टॅग्स :ThergaonथेरगावSchoolशाळाAccidentअपघातStudentविद्यार्थी