शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; भारतीय संघाचा T20I मधील घरच्या मैदानातील सर्वात मोठा पराभव
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
5
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
6
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
7
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
8
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
9
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
10
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
11
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
12
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
13
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
14
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
15
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
16
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
17
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
18
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
19
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
20
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Dange chowk-Chinchwad Road : दत्तनगर रस्त्यावर पुन्हा ऑइल गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:53 IST

स्थानिक युवकांचे प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला 

हिंजवडी : अत्यंत वर्दळीच्या अशा डांगेचौक-चिंचवड रस्त्यावरील दत्तनगर येथे पुन्हा ऑइल गळती झाली. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर पडलेल्या ऑइलचा अंदाज येत नसल्याने त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरले. मात्र, स्थानिक युवकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

सोमवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास चिंचवडच्या दिशेला जाणाऱ्या एका अज्ञात वाहनामधून दत्तनगर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली. दुचाकीस्वार घसरून पडू लागल्याने ही बाब स्थानिक युवकांच्या लक्षात आली. तत्काळ वाहतुकीचे योग्य नियोजन करत स्थानिकांनी वाहनचालकांना सावध केल्याने पुढील अपघात टळले. त्यानंतर थेरगाव अग्निशमन दलाला माहिती कळवून उपस्थित युवकांनी दुभाजकामधील माती सांडलेल्या ऑइलवर टाकली.दरम्यान, डांगेचौकसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या ऑइल गळतीमुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वीसुद्धा डांगेचौक परिसरात अनेकवेळा रस्त्यावर ऑइल गळती झाल्याने अपघात झाले आहेत.वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे. दत्तनगर या ठिकाणी झालेल्या ऑइल गळतीवेळी विलास येळवंडे, अशोक धुमाळ, अनिल घोडेकर, कुणाल तारू, मुसवीर सोंडे, गणेश तिकोने, अमोल पाटील, रमेश भोंडवे, आर्यन पवार, अथर्व धुमाळ यांनी प्रसंगावधान दाखवत सहकार्य केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकhinjawadiहिंजवडीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पPoliceपोलिस