अधिकाऱ्यांकडून शिक्षा, टग्यांची अरेरावी; वाहतूक पोलीस सापडले कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:05 IST2018-12-15T03:05:19+5:302018-12-15T03:05:39+5:30
नियमांची अंमलबजावणी केल्याने रोष; टाळाटाळ केल्यास घेतली जाते ‘हजेरी’

अधिकाऱ्यांकडून शिक्षा, टग्यांची अरेरावी; वाहतूक पोलीस सापडले कचाट्यात
पिंपरी : वाहतूक नियमनाऐवजी गप्पात रंगलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाºयांवर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कर्मचाºयांना आयुक्तालयात बोलावून सर्वांसमोर कवायत करण्याची शिक्षा दिली.
आयुक्त पद्मनाभन चिंचवड स्टेशन येथून मोटारीतून जात असताना तेथील चौकामध्ये दोन वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, ते एका बाजूला थांबून गप्पा मारत होते. कामचुकारपणा केला जात असल्याने पोलीस आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाºयांची माहिती घेऊन त्यांना आयुक्तालयात बोलावून घेतले. चौकशीअंती त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे लक्षात आले. कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना आॅटो क्लस्टर येथील आयुक्तालयासमोर कवायतीची शिक्षा दिली. आयुक्तांच्या अशा अनोख्या शिक्षेमुळे इतर पोलीस कर्मचाºयांनीही धास्ती घेतली आहे.
साध्या मोटारीत इतर अधिकाºयांसमवेत शहरात राऊंड मारत असताना चिंचवड स्टेशन चौकात दोन कर्मचारी कर्तव्यावर असताना कामचुकारपणा करताना आढळले. त्यांना कवायत करण्याची शिक्षा केली. दरम्यान, कामचुकारपणा करणाºया कर्मचाºयांना कार्यालयात बोलावून कवायत करण्यास लावण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. - आर. के. पद्मनाभन,
पोलीस आयुक्त