Offense against a husband for defamation of married women on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची बदनामी केल्याने पतीविरोधात गुन्हा
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची बदनामी केल्याने पतीविरोधात गुन्हा

पिंपरी : माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केला. तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीने शिवीगाळ करून बदनामी केली. वाकड येथे २६ मे २०१९ पासून ते रविवार (दि. ३) दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व आरोपीचे १२ मे २०१९ रोजी लग्न झाले. घरात लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी पती व सासू यांनी फिर्यादी महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच माहेरकडून आणलेले २५ तोळे सोने व चारचाकी गाडी सासूने त्यांच्याकडे ठेवले. वेळोवेळी चारित्र्याचा संशय घेऊन आरोपी पतीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेचे व त्यांच्या मित्राचे झालेले संभाषण त्यांच्या भावाला पाठवून बदनामी केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Offense against a husband for defamation of married women on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.