शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद "

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:49 IST

मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते, अशी चर्चा आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय विभागाकडून सोनोग्राफी सेंटरकडे दुर्लक्षतालुक्यात ३९ सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यातील पाच बंद

विजय सुराणा-  वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे,  अशी चर्चा आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते. परंतु याप्रकरणी भरारी पथकाकडून चौकशी होत नाही किंवा याप्रकरणी कोणी तक्रारही देत नाही, त्यामुळे या प्रकरणाची अवस्था ना-दाद ना फिर्याद अशी झाली आहे. मावळ तालुक्यामध्ये मुलीचा जन्मदर २०११ ते १२ या वर्षात हजारी ८५१ होता. त्यानंतर २०१४ -१५ मध्ये ९२५ झाले होते. यासाठी जनजागृती करण्यात आली होती. आता हे प्रमाण पुन्हा ९०२ वर आले आहे.  मुलीचा जन्मदर पुन्हा घटत आहे.  यामागची कारणे शोधावीत, अशी मागणी होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. चंद्रकांत लोहारे  म्हणाले, ‘‘सोनोग्राफीचा दुरुपयोग  झाल्याने सन २०११ ते १२ या वर्षात  हजारी  ८५१ इतका मुलींचा जन्मदर घटला होता. त्यानंतर जनजागृतीमुळे  व कारवाई केल्याने सोनोग्राफीचा  दुरुपयोग  होण्याच्या प्रमाणात  काहीशी  घट झाली. परंतु  अद्यापही काही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे असे समजते.’’डॉ. जी. जी. जाधव भरारी पथक म्हणाले, ‘‘तालुक्यात ३९ सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यातील पाच बंद आहेत. एकाचा न्यायालयात दावा सुरू आहे. या महिन्यात आम्ही सर्वत्र तपासणी केली आहे. शासनाने २५ हजार रुपयांचे  बक्षीस ठेवले आहे.’’.............. सध्यातरी अशी चर्चा कानावर आली नाही. तालुक्यातील  मुले व मुलींची संख्या किती आहे हे पाहावे लागेल. परंतु जर कोणी डॉक्टर  सोनोग्राफी  सेंटरमधून अशी बेकायदेशीर तपासणी करत असेल तर आमची संघटना त्याला कधीही पाठीशी घालणार नाही. - डॉ.  दिलीप भोगे, अध्यक्ष, मावळ तालुका डॉक्टर असोसिएशन.

......

वर्षे                      मुले            मुली        एकूण      दरहजारी सरासरी                                                                             मुलींचे प्रमाण २०११-१२            २०१९          १७२७       ३७५६           ८५१२०१२- १३           २११०          १९१०     ४०२०            ९०५  २०१३- १४           १८७३          १७२२    ३५९५              ९११ २०१४- १५           १४२८        १३२०      २७४७              ९२४ २०१५- १६          १८४७         १५८०       ३४२७              ८५५ २०१६- १७           १३७९       १२३८       २६१७              ८९७२०१७- १८          १५८९        १४३६       ३०२५                ९०३२०१८- १९          १४३६        १२९६     २७३२               ९०२

टॅग्स :mavalमावळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHealthआरोग्य