शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण झाले '' रोगट ''

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 4:23 PM

पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजीमंडईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे...

ठळक मुद्देपिंपरीतील भाजीमंडई : कचरा उचलण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यातमहापालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी नवीन घंटागाड्यांची खरेदी

- नारायण बडगुजर-  पिंपरी : प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजीमंडईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण तसेच भाजीमंडई असल्याने येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. शहरातील प्रत्येक भागातील नागरिक येथे येतो. त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्यास बाधा होऊन शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी नवीन घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी कचरा संकलन होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील कचराकुंड्या कचऱ्याने ओसंडत आहेत. अशीच परिस्थिती पिंपरीतील भाजीमंडईत आहे. येथील कचरा उचलण्यात येत नसल्याने तो कुजून दुर्गंधी होत आहे. डुक्कर आणि मोकाट जनावरे हा कचरा पसरवतात. त्यामुळे येथे सर्वत्र कचराच-कचरा झाल्याचे दिसून येते. या कचºयात टाकून देण्यात आलेला हिरवा भाजीपाला मोठ्या प्रमाणात असतो. पावसाच्या पाण्यामुळे तो भाजीपाला कुजला आहे. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशा, डास आणि चिखलामुळे येथील वातावरण रोगट झाले आहे. पिंपरी रेल्वे स्टेशनला लागून असल्याने येथे शहराच्या विविध भागांतून, पुण्यातून तसेच मावळातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा राबता असतो.  तसेच भाजीपाला खरेदी व विक्रीसाठी येणाऱ्याचीही संख्या मोठी आहे. मंडईलगतच बीफ विक्रीची दुकाने आहेत. तसेच मुख्य बाजारपेठही येथे आहे. त्यामुळे या परिसरात शहरातील प्रत्येक भागातील नागरिक खरेदी तसेच विविध कामानिमित्त येतात. मात्र येथील वातावरण रोगट असल्याने या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांची लागण होऊन शहरभर त्याचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. कचराकुंडीलगतच काही विक्रेते उघड्यावर भाजीपाला विक्री करतात. अस्ताव्यस्त पसरलेला कचरा, दुगंर्धी, माशा, डास अशा वातावरणात भर पावसात असे विक्रेते व्यवसाय करतात. पाऊस आणि कचऱ्यामुळे चिखल झालेला असतानाही दुकान मांडलेले असते. ग्राहकांना ये-जा करायलाही पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. चिखल तुडवत ग्राहक मार्ग काढतात. 

स्वच्छतागृहातच अस्वच्छताहेपिंपरीतील भाजीमंडईतील कचराकुंडीलगत पुरुष व महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आ. मात्र, त्याची नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. तेथे मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. परिणामी पुरुष आणि महिलांना या स्वच्छतागृहाचा वापर करता येत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या परिसरात उघड्यावरच नैसर्गिक विधी केला जातो. त्यामुळेही येथे दुर्गंधी होत आहे.  

कचरा उचलण्यासाठी नव्याने ठेका देण्यात आला आहे. पूर्वी कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळाचा वापर होत असे. मात्र नवीन ठेकेदार यंत्राच्या साह्याने कचरा उचलणार आहे. त्यासाठी जेसीबी व ट्रकचा वापर करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी काही प्रमाणात कचरा उचलला. उर्वरित कचरा रात्री उचलण्यात येईल.- महादेव शिंदे, सहायक आरोग्य अधिकारी, ह्यअह्ण क्षेत्रीय कार्यालय, महापालिका   

........................

महापालिकेने नियमित कचरा उचलणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत उदासिनता दिसून येते. टाकाऊ तसेच शिळा भाजीपाला कचराकुंडीत टाकला जातो. मात्र, चिखल व घाणीमुळे कचराकुंडीपर्यंत पोहोचता येत नाही. परिणामी कचरा उघड्यावर टाकला जातो. याबाबत उपाययोजना झाली पाहिजे.- बाळासाहेब शिंदे, विक्रेता, भाजीमंडई, पिंपरी

भाजीमंडईतील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे भाजीमंडईत आणि परिसरात दुर्गंधी असते. याचा त्रास ग्राहकांना होतो. माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेऊन कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे. - बाळासाहेब बोऱ्हाटे , विक्रेता, भाजीमंडई, पिंपरी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य