पुणे: भाचीने घातली मामालाच टोपी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरले

By नारायण बडगुजर | Published: July 19, 2022 02:47 PM2022-07-19T14:47:20+5:302022-07-19T14:49:51+5:30

२४ वर्षीय भाचीला पोलिसांकडून अटक...

niece's Jewels worth 2 lakhs were stolen pune crime news | पुणे: भाचीने घातली मामालाच टोपी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरले

पुणे: भाचीने घातली मामालाच टोपी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरले

googlenewsNext

पिंपरी : करामती भाच्यांकडून मामाला टोपी घातल्याचे प्रकार सर्रास घडतात. मात्र, एका भाचीने चक्क मामाच्या घरातून दोन लाख १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. या भाचीला पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (दि. १६) मावळ तालुक्यातील माळवाडी येथे घडली.

याप्रकरणी ५८ वर्षीय मामाने सोमवारी (दि. १८) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २४ वर्षीय भाचीला पोलिसांनी अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी ही फिर्यादीच्या घरी आली असताना घराच्या उघड्या खोलीत ठेवलेली चावी घेऊन घराचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर घरातून एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र, ३५ हजारांचे ब्रेसलेट, ३० हजारांची चपटी साखळी, १२ हजारांची चौकोनी अंगठी, नऊ हजारांची अंगठी, १२ हजार रोख रक्कम, असा एकूण दोन लाख १८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादीने याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी फिर्यादीच्या भाचीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पंडीत अहिरे तपास करीत आहेत.

Web Title: niece's Jewels worth 2 lakhs were stolen pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.