वाल्हेकरवाडीत नवविवाहित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:19 IST2018-07-14T20:19:17+5:302018-07-14T20:19:50+5:30

पेंटिंगचे काम करणाऱ्या व तीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे . पण आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

Newly married youth commits suicide in Walhekarwadi | वाल्हेकरवाडीत नवविवाहित तरुणाची आत्महत्या

वाल्हेकरवाडीत नवविवाहित तरुणाची आत्महत्या

पिंपरी : नवविवाहित तरुणाने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे उघडकीस आली. रमेश उत्तम करकरो (वय २४, रा. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हा पेंटिंगचे काम करीत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास रमेश याने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तो मृत झाला असल्याचे घोषित केले. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Newly married youth commits suicide in Walhekarwadi