राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:38 IST2020-07-07T13:37:30+5:302020-07-07T13:38:06+5:30
पिंपरी: पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन ...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
पिंपरी: पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. कुटुंबियांशी संवाद साधला. दरम्यान, चिखली ग्रामस्थांनी आदित्य बिर्ला हॉस्पीटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते. कोरोनामुळे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे दि. 4 जुलै ला हॉस्पीटलमध्ये निधन झाले आहे. शरद पवार आज साने यांच्या चिखलीतील निवासस्थानी दाखल झाले. साने कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी चिखली ग्रामस्थांनी बिर्ला हॉस्पीटलची चौकशी करण्याची मागणी केली.
आक्रमक, परखड असे ते व्यक्तिमत्व
दत्ता साने चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता.महापालिकेत विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. आक्रमक, परखड असे ते व्यक्तिमत्व होते. 25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले होते. त्यांना कोरोनासह न्यूमोनियाची देखील लागण झाली होती.