शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:26 IST

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा अजित पवार गट तुल्यबळ असून, पवारांची उद्योगनगरीवर विशेष मर्जी राहिली आहे. त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या रूपाने विधानसभेचे उपाध्यक्षपदही शहराच्या पदरात टाकले. मात्र, बनसोडे यांच्यासह शहराध्यक्ष योगेश बहल कार्यकर्त्यांना ताकद देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा गट थंड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते. तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २० ते २५ नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटाला शहराध्यक्ष मिळणे मुश्किल झाले होते. अखेर माजी महापौर योगेश बहल यांची वर्णी लागली. शरद पवारांकडे गेलेले बहुतांशी नगरसेवक विधानसभा निकालानंतर माघारी वळले. या दरम्यान, शहराध्यक्ष बहल यांच्या तक्रारी पवार यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना शहराध्यक्ष करण्यास विरोध केल्याचे पुढे आले होते. विधानसभा उपाध्यक्ष नावालाचशहराला अण्णा बनसोडे यांच्या रूपाने विधानसभेचे उपाध्यक्षपद लाभले आहे. मात्र, बनसोडे कार्यकर्त्यांना सोडाच, पदाधिकाऱ्यांही भेटत नाहीत. ना पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री पवार शहरात येणार असतील, तरच ते हजर असतात. इतरवेळी ते गायब असतात. त्यामुळे शहराला दिलेले एवढे मोठे पद फक्त शोभेसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.नवसंजीवनी देणारा शहराध्यक्ष हवाअजित गव्हाणे पक्ष सोडून गेल्यानंतर अजित पवार गटाचा शहराध्यक्ष स्थानिक व सर्वांना सामावून घेणारा असावा, यासाठी त्यावेळी शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी बहल यांचे नाव जाहीर करत सर्वांना धक्का दिला होता, तेव्हापासून शहरातील एक गट नाराज आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी देणारा शहराध्यक्ष हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार