शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 23:39 IST

पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या शहरविकास मंत्रालयातर्फे सोसायटी सदस्यांना हा पुरस्कार स्विकारण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे.याविषयी रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर म्हणाले की, भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायटीमध्ये स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टीक व ई-वेस्ट गोळा करण्यास सुरुवात केली. पुढे आम्ही ओला कचरा, पालापाचोळा गोळा करुन त्यापासून खत निर्मिती सुरु केली. यामध्ये २० ते २५ कुटुंबे आता घरच्या घरी खत निर्मिती करतात.सोसायटीतर्फे अन्य सदस्यांनाही खत निर्मितीसाठी मार्गदर्शन केले जाते. यानुसार सोसायटीमध्ये तीन महिन्याला एक टन खत निर्मिती होते. हे खत सध्या सोसायटीच्या बागेतच वापरले जाते. मात्र खत निर्मिती पाहता राज्य सरकारने इतर काही संस्थानाही खत विकण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. हा जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आहे. यासाठी सिद्धार्थ नाईक, आनंद दप्तरकर व सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सोसायटीच्या रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले.केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत मोहिमे'त सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी चिंचवड मधील रोजलँड रेसिडन्सिने 'आपले घर' ही संकल्पना राबविली. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांच्या संकल्पनेतून एक व्हिडीओ देखील बनविण्यात आला आहे. रोजलँड रेसिडेन्सीने कच-याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला आहे. ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा अशा प्रकारे कचºयाचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कच-याचे घरच्या घरीच कंपोस्ट खत बनविण्यात येते. पालापाचोळा किंवा नैसर्गिक सुका कचरा झाडांच्या बुंध्याला टाकून तसेच खतनिर्मिती करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. तर ई-कचरा कमिन्स इंडिया कंपनीला दिला जातो. स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे सध्या सोसायटीमधून जाणारा कचरा ३०-४० टक्क्यांनी घटला आहे. २ आॅक्टोबर, २०१८ पर्यंत सोसायटीमधून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर जाऊ न देता सर्व कच-याचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे.