Hinjewadi Crime: हिंजवडीत भरदिवसा कपाळावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 14:35 IST2021-10-04T14:27:36+5:302021-10-04T14:35:33+5:30
दुपारी चार ते सायंकाळी सव्वासहा या कालावधीत ही घटना घडली.

Hinjewadi Crime: हिंजवडीत भरदिवसा कपाळावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून
पिंपरी : मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंडवड शहर परिसरात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी सलग आठ दिवस शहरात खूनाचे गुन्हे घडले होते. आता शहरात एका व्यक्तीवर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे. हिंजवडी परिसरातील चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे रविवारी (दि. ३) दुपारी चार ते सायंकाळी सव्वासहा या कालावधीत ही घटना घडली.
संतोष विश्वनाथ माने (वय ३८), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने (वय ३५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे पती संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.