धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; भोसरी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 21:03 IST2021-07-26T21:03:12+5:302021-07-26T21:03:48+5:30
आरोपींनी अमन यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले.

धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; भोसरी येथील घटना
पिंपरी : धारदार शस्त्राने वार करून अज्ञात इसमांनी तरुणाचा खून केला. भोसरी येथील लांडगेआळी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ सोमवारी (दि. २६) सकाळी ही घटना उघडकीस आली.
अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमन डांगळे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले. बाहेर जाऊन येतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रात्री अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी अमन यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यात अमन यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनस्थळावरून पोलिसांनी अमन यांची दुचाकी आणि चप्पल जप्त केली.