शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

पिंपरीत कोरोना रुग्णांत वाढ; महापालिका आणि पोलीस प्रशासन 'इन अ‍ॅक्शन मोड' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 9:16 PM

शहर परिसरातील शिथिल केलेले निर्बंध कडक

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर परिसरातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या संदर्भातील नियमावली अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बुधवारी (दि. १७) जाहीर केले आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत कमी झालेला कोरोनाचा विळखा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाढू लागला आहे. शंभराच्या आत आलेली रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा आलेख कमी झाल्याने शिथिल केलेले निर्बंध कडक करण्याच्या उपाययोजना महापालिका प्रशासनाच्या वतीने अवलंबल्या जाणार आहेत. यासंदर्भात आज नवीन आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोनासंदर्भात बैठक घेऊन आरोग्य आणि वैद्यकीय विभागास सूचना दिल्या आहेत. तसेच

नवीन नियमावली : 

१) शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी, शासकीय, खासगी कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. 

२) महापालिका क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालय, सांस्कृतिक सभागृह, सामाजिक धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन सभा संमेलन अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर बंधनकारक केला आहे. 

४) हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहे, बाजार पेठ मॉल याठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. 

५) मास्क आणि थुकणाऱ्या विरोधात कारवाई तीव्र करणार आहे. मास्क वापरणारे नागरिकांना पाचशे रुपये तसेच सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या नागरिकास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकार अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले होते. मात्र यात बदल करून महापालिका आणि पोलीस कारवाई करतील. 

६) महापालिकाकार्यक्षेत्रातील आठ क्षेत्रीय कार्यालय, सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह पोलिसांवरही कारवाईची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 

७) नागरिकांची गर्दीची ठिकाणे शोधणे आणि गर्दीची पाहणी करण्याचे जबाबदारी सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर देण्यात आलेले आहे.

 ......... महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत असून याचे प्रमुख कारण नागरिक मास्क चा वापर करत नाही, नियमांचे पालन करीत नाहीत, हे दिसून आले आहे. तसेच सरसकट नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे शिथिल केलेले नियम कडक करण्यात येत आहेत. शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटल