शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

टपाल खात्यासमोर समस्यांचा डोंगर, अपुरे मनुष्यबळ ठरतेय अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:41 AM

अपुरे मनुष्यबळ : पोस्ट पेमेंट बँकेची अंमलबजावणी पडणार लांबणीवर

भोसरी : केंद्र सरकारने घोषित केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेची (आयपीपीबी) पिंपरी-चिंचवड शहरात अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी आवश्यक मोबाइल कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आले आहेत. मात्र, अपुºया मनुष्यबळाअभावी ही योजना प्रत्यक्षात अमलात कशी आणायची असा प्रश्न टपाल खात्याला पडला आहे.

बॅँक सेवेला ग्राहकांच्या घरी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयपीपीबी’ची योजना जाहीर केली आहे. पुणे शहरात १ सप्टेंबरपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबरअखेरपर्यंत योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, डिसेंबर महिना अर्ध्यावर आला, तरी ही योजना अद्याप सुरू करणे टपाल खात्याला शक्य झाले नाही. नववर्षातच शहरात ही योजना सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पत्रव्यवहाराबरोबरच, विविध परवाने, आधारकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), धनादेश, मुलाखतीचे कॉल, विविध पार्सल नागरिकांपर्यंत टपाल कर्मचाºयांना पोहोचवावे लागतात. त्यातच आता घरोघरी जात ‘आयपीपीबी’चे खाते उघडण्याचे काम टपाल कर्मचाºयांना करावे लागणार आहे. कर्मचाºयांना नुकतेच याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. खाते उघडून देण्यासाठी कर्मचाºयांना मोबाइलचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, रोजचे टपाल वाटप पूर्ण करायचे की ‘आयपीपीबी’साठी फिरायचे, असा सवाल कर्मचाºयांना सतावत आहे.टपाल खात्याच्या पुणे पूर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी-चिंचवडसह खडकी, हडपसर असा पुण्याचा काही भाग देखील येतो. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, चिखली, हिंजवडी, पिंपरी कॉलनी या ठिकाणी टपाल कार्यालये आहेत. सुमारे २२ लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघे १३६ टपाल कर्मचारी कार्यरत आहेत.काय आहे आयपीपीबी?बचत खाते आणि चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे व हस्तांतरण करणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डी.बी.टी.), बिल आणि ‘युटिलिटी पेमेंट’ आदी सेवा या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. शून्य रकमेवर केवळ आधार क्रमांक आणि ‘बायोमेट्रिक’वर खाते उघडले जाणार असून, टपाल कर्मचारी ही घरपोच सेवा देणार आहेत. खाते उघडल्यानंतर घरबसल्या केवळ संदेश पाठवून पोस्टमनकडून पैसे मागवू, तसेच पैसे भरणे शक्य होणार आहे. ‘डिजिटायझेशन’बरोबरच टपाल खात्यालाही यातून नवसंजीवनी मिळणार आहे.पिंपरी-चिंचवड टपाल कार्यालयाची सद्य:स्थितीपत्रांची डिलिव्हरी होणारी केंद्रे : 16पोस्टमनची संख्या : 136ग्रामीण डाक सेवक : 34रिक्त पदे : 120दैनंदिन एका केंद्रावर येणारी रजिस्टर व स्पीड पोस्ट : 1 ते 2000

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिस