mother-in-law filed robbery complaint against son-in-law | जावयाचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, सासूची पोलिसात तक्रार
जावयाचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, सासूची पोलिसात तक्रार

पिंपरी :  पत्नी रुग्णालयात दाखल असताना सासू पत्नीला भेटण्यासाठी आली. त्यावेळेची सासूकडून घराची चावी घेतली. त्या चावीच्या आधारे फ्लॅटमधून सोन्याचे दागिने व बँकेचा चेक असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज जावयाने चोरून पोबारा केला. ही घटना शनिवारी (दि. १६)  साडेबाराच्या सुमारास परांडे होम्स दिघी गावठाण येथे घडली.

या प्रकरणी छाया संजय छोगा (वय ४७, रा. परांडे होम्स, दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश समाधान चौधरी (वय २७, रा. साई पार्क दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा फिर्यादी छाया यांचा जावई आहे. शनिवारी योगेशच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे छाया आपल्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या. तिथे आरोपी योगेश होता. त्याने छाया यांच्याकडून त्यांच्या फ्लॅटची चावी घेतली. छाया यांच्या घरी जाऊन सोन्या-चांदीचे दागिने आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा ६० हजार रुपयांचा धनादेश असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: mother-in-law filed robbery complaint against son-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.