आई, मुलावर कोयत्याने वार ; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:46 IST2020-02-25T20:45:39+5:302020-02-25T20:46:37+5:30

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. दगड, सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले.

Mother, child slaughtering boy; Nine convicted of attempted murder | आई, मुलावर कोयत्याने वार ; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

आई, मुलावर कोयत्याने वार ; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. दगड, सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घरकुल, चिखली येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्नू कोरी, विकास ऊर्फ पांग्या जाधव, जय करसुळे, ज्युनेत ऊर्फ आण्ण्या, मोन्या, सोयल्या ऊर्फ चिप्स (पूर्ण नाव माहीत नाही) आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेखा बालाजी गायकवाड (वय ४२, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादींचा मुलगा सुहास ऊर्फ पिल्या यांचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी रेखा यांची मुले सुहास आणि आकाश यांना दगड, सळई व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. ही भांडणे सोडविण्यासाठी रेखा गेल्या असता, आरोपींनी आकाशवर कोयत्याने वार केले. रेखा यांनी आरोपींना ढकलून दिले असता, रेखा यांच्यावरदेखील कोयत्याने वार केले. यामध्ये रेखा आणि त्यांची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. आरोपींनी आणखी दोन ते तीन लोकांना मारहाण केले आणि पसार झाले.

Web Title: Mother, child slaughtering boy; Nine convicted of attempted murder