शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५०० पेक्षा जास्त रहिवासी हवा प्रदूषणविरोधात रस्त्यावर; वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा मूक मोर्चा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 8, 2025 17:08 IST

वाकड ताथवडे परिसरात सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत

पिंपरी : वाकड-ताथवडे परिसरातील २२ हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांचे ५०० पेक्षा जास्त रहिवासी शनिवारी (दि.०८) “हवा प्रदूषण विरोधात एकत्र आले. मूक मोर्चा काढून नागरिकांनी सिमेंट मिक्स धुळ आणि बांधकामाच्या धुळीमुळे वाढलेल्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवत स्वच्छ व निरोगी पर्यावरण आमचा हक्क असून त्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे अशी ही मागणी नागरिकांनी केली.

वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटी पासून इंदिरा स्कूल मार्गे वाकडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मूक मोर्चा द्वारे पर्यावरण, प्रदूषण, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत असा मुद्दा यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.

हवेची गुणवत्ता दररोज घसरत असल्यामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे, अॅलर्जीचे आणि श्वसनासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे, प्रदूषण वाढल्याने नैसर्गिक जीवनमानावर परिणाम दिसून येत आहे. सिमेंटच्या धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या...

- सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी.- वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात.- वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.- रस्त्यांची नियमित २ वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे.- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई केली जावी.- स्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे, एअर गन द्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा मारला जावा.- प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी.- रस्त्यांवरील झाडांची देखभाल आणि पाणी नियमित करावे.

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलनpollutionप्रदूषणHealthआरोग्यSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिला