किरकोळ वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 04:26 IST2018-10-13T04:25:48+5:302018-10-13T04:26:04+5:30

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर वार करून खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री ...

minor reason youth killed | किरकोळ वादातून तरुणाचा खून

किरकोळ वादातून तरुणाचा खून

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर वार करून खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. विनोद माताफीर गिरी (रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दयाराम शीतलप्रसाद गिरी, बाबूराम शीतलप्रसाद गिरी आणि जयप्रकाश कृष्णा गिरी (सर्व रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) या आरोपींना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी - विनोद आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. शुक्रवारी मध्यरात्री विनोद यांच्या घरासमोरील पाण्याच्या ड्रमला दयाराम याने लाथ मारली. यावरून त्यांच्यात शिवीगाळ झाली व वाद वाढला. दरम्यान, विनोद यांच्यावर आरोपींनी चाकूने वार करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. शुक्रवारी रात्री हा वाद विकोपाला गेला.

Web Title: minor reason youth killed