आमदार नितेश राणे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

By नारायण बडगुजर | Updated: September 5, 2022 23:56 IST2022-09-05T23:56:25+5:302022-09-05T23:56:32+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

Minor accident to Nitesh Ranes vehicle mumbai pune express way | आमदार नितेश राणे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

आमदार नितेश राणे यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

पिंपरी : आमदार नितेश राणे यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसून गाडीचे नुकसान झाले आहे. पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या चारचाकी वाहनातून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथून पुण्याच्या दिशेने जात होते. उर्से टोल नाका येथे एका ट्रकने राणे कुटुंबीयांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. यात गाडीचे नुकसान झाले.

गाडीत नितेश राणे यांच्या पत्नी ऋतुजा राणे आणि कुटुंबीय होते. यातील कोणीही जखमी झाले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघात झालेल्या या गाडीत नितेश राणे नव्हते. अपघात प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Minor accident to Nitesh Ranes vehicle mumbai pune express way