चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर 'मोक्का'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतेय कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:10 PM2024-03-04T13:10:27+5:302024-03-04T13:10:59+5:30

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे....

mcoca on Rahul Yadav gang in Chikhli area; The action is taking place in the background of the elections | चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर 'मोक्का'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतेय कारवाई

चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर 'मोक्का'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतेय कारवाई

पिंपरी : चिखली परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या राहुल यादव टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार गुन्हेगारी टोळ्यांमधील २४ गुन्हेगारांवर मोकाची कारवाई केली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.

टोळी प्रमुख राहुल प्रल्हाद यादव (३२, रा. कुदळवाडी, चिखली), नागेश गुलचंद सूर्यवंशी (२८, रा. सोळू, ता. खेड), रोहन भानुदास यादव (२१, रा. चिखली), आशिष भीमराव बजलव (२७, रा. कुदळवाडी, चिखली), राजेश बहरीच निसाद (३२, रा. कुदळवाडी, चिखली) अशी मोका कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यादव आणि त्याच्या साथीदारांवर मागील वर्षी चिखली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. राहुल यादव याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून आळंदी आणि चिखली परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीर जीवघेणी हत्यार बाळगणे असे सात गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी त्यांनी हे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीवर मोकांतर्गत कारवाई करण्यासाठी चिखली पोलिसांनी प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावर अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोकांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: mcoca on Rahul Yadav gang in Chikhli area; The action is taking place in the background of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.