पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीची नग्न छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देत नराधमाने पैशांचीही मागणी केली होती.याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीसह त्याला मदत करणाºया महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली आहे. महिला मात्र फरार आहे. सचिन सुभाष जाधव ऊर्फ रुद्र पाटील (वय २९, रा. नवलाख उंब्रे, तळेगाव) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी भीमराव जाधव (वय २२, रा. ताडोली तांडा, परळी, बीड) या दोघांवरनिगडी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल केला असून तेजस्विनी अद्याप फरार आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीनेलग्नाचे अमिष दाखवून जानेवारी २०१६ ते ६ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तुळजापूर, सोलापूर व चिखली अशा विविध ठिकाणी वारंवार अत्याचार केले. या गुन्ह्यामध्ये तेजस्विनी जाधवने आरोपीला मदत केली.तसेच आरोपींनी पीडितेची नग्न छायाचित्रे काढून तिच्या भावाला पाठवली. १० लाख रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर बलात्कार, खंडणी, फसवणूक असे गुन्हे दाखल केले आहेत.
लग्नाच्या आमिषाने बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:49 IST