शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लग्न, अनैतिक संबंध, अन् कर्ज...; नकुल भोईर खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:37 IST

दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

पिंपरी : चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खुनात पत्नी चैतालीसह तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चैताली आणि दीपक या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दि. २४ ऑक्टोबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून केल्याची माहिती पत्नी चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून दिली होती. चिंचवड येथील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी चैतालीला अटक केली होती. मात्र, यात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते.

सिद्धार्थ-चैतालीच्या प्रेमसंबंधावरून नकुलशी वाद होत असत. प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने दोघांनी नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहितीही नकुल यांना समजली. त्यावरून भांडण झाले. यावेळी नकुलने तिला मारहाण केली. तिला मारहाण झाल्याने सिद्धार्थचा राग अनावर झाला. दोघांनी संगनमताने ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केला.

पोलिसांना ओढणी लपवून दुसरीच दाखवण्याचा प्रकारचैतालीने आपणच नकुलचा गळा आवळला असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तपासात दोघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला, ती ओढणी सिद्धार्थ जाळून टाकणार होता. कारण तिला नकुलच्या घामाचा वास होता. त्यामुळे चैतालीने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला, ती जप्त करण्यासाठी चैतालीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Love affair, debt, and murder: Wife's lover arrested in Nakul Bhoir case

Web Summary : Nakul Bhoir's wife and her lover arrested for his murder in Chinchwad. The motive involved their affair, financial debts, and marital disputes. They strangled him with a scarf.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी